<
इंदापूर(प्रतिनिधी)- तालुक्यातील अशोकनगर येथे अजिंक्य क्रीडा मंडळ यांच्या वतीने इ. १० वी, १२ वीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना पेढा भरवून, पेन व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. १० वी, १२ वी म्हटलं की शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा तो यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य नंदराज थोरात यांनी मुलांना मार्गदर्शन केले. जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिकपणा अंगी असेल तर कोणतेही यश सहज साध्य होते. हे गुणवंत विद्यार्थी नक्कीच गावाचे नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासन प्रेरणा प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आले. या कौतुक सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड, सलीम शेख, चंद्रकांत वाघमारे, आण्णा भंडारी, चंद्रकांत अडसूळ, चंद्रकांत सावंत, लालू कांबळे, संतोष वाघमारे, शैलेश भोसले, संतोष लोंढे, रणजीत साळवे, बापू मिसाळ, भिवा सोनवणे, विशाल सोनवणे तसेच अजिंक्य क्रीडा मंडळ व प्रेरणा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. कानिफनाथ ननवरे यांनी केले तर आभार यांनी मानले.