Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय जनता पक्षाच्या वतीने व दुध उत्पादक तसेच शेतकरी यांच्या समस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जामनेर येथे रास्ता रोको आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
भारतीय जनता पक्षाच्या वतीने व दुध उत्पादक तसेच शेतकरी यांच्या समस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जामनेर येथे रास्ता रोको आंदोलन

जामनेर/ प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
सात महिन्यांपूर्वी राज्यात महा विकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असून सरकार स्थापन करीत आहोत असे म्हणत सरकार स्थापन केले मात्र तमाम जनतेची व शेतकरी वर्गाची उद्धव ठाकरे सरकारकडून उपेक्षाच केली जात असून अपेक्षित न्याय दिला गेला नसल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे .
भारतीय जनता पक्षाच्यावतीने दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या समस्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष याबाबत लक्ष वेधण्यासाठी आज नगरपालिका चौकात जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
जिल्ह्यात ठीक ठिकाणी व राज्यभरात भाजपकडून आंदोलन करण्यात आले आघाडी शासनाकडून सर्वच शेतकरी हिताच्या योजना बंद करण्याचा सपाटा सुरू असून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यात राज्यात चांगल्या योजना शेतकरी कष्टकरी जनतेच्या हिताच्या होत्या त्या सर्व थंड बस्त्यात टाकून बंद करून टाकल्या मका कापूस खरेदी बंद केली आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल पडला असून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाइपलाइन पोहोचलेली आहे त्यावर खर्च मोठ्या प्रमाणात झालेला आहे मात्र त्या ठिकाणी हे शासनाने त्या संबंधित शेतकऱ्यांना शेततळी न दिल्याने त्यांना शेतीला पाणी देता येणार नाही यासारख्या योजना बंद केल्या आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर खते बी-बियाणे देऊ असे म्हणणारे सरकार च्या काळात दुकानात देखील खत मिळत नाहीत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे .
दूध उत्पादक शेतकरी देखील बेजार झाले असून लवकरात लवकर या सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही तर सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री महाजन यांनी दिला.
सोशल डिस्टंसिंग चे पालन करून जामनेर नगरपालिका चौकात स्वतः गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी दुधाचे आणलेली कॅन तहसिलदार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली दुधाची आम्ही नासाडी करणार नाही मात्र हे दूध कोविड सेंटरला देण्यात यावे असे यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी तहसीलदार यांना सांगितले.
यावेळी भाजपा पक्षाचे तालुकाध्यक्ष चंन्द्रकांत बाविस्कर,छगन दादा झाल्टे,नगर सेवक आतिष झाल्टे,शिक्षण संस्थेचे सचिव जितू
पाटील,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, दिपक पाटील,नितीन झाल्टे,नवल पाटील, महेंद्र बाविस्कर,बाबुराव घोंगडे,राजधर पांढरे,रंविद्र झाल्टे,चंन्द्रशेखर काळे,अमर पाटील,कैलास पालवे, गोविंद अग्रवाल आदी भाजपा पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्ध्यांना प्रमान पत्र देऊन सत्कार

Next Post
श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्ध्यांना प्रमान पत्र देऊन सत्कार

श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्ध्यांना प्रमान पत्र देऊन सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d