<
जामनेर/प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
जामनेर पासून जवळच असलेल्या होळ हवेली फाटा येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्याम चैतन्यजी महाराज यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील तब्बल 50 जणांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला. संतांचे जीवन समाजकार्यासाठी असते.
‘सन्मान प्रत्यक्ष आपल्या हातात’ या उक्तीप्रमाणे स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन कोरोना योद्ध्यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित गौरव करून सन्मानपत्र भेट देऊन त्यांच सत्कार करण्यात आले.
श्याम चैतन्य जी महाराज यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यापासून जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना ‘एक घास प्रेमाचा…!’ या कार्यक्रमाअंतर्गत अन्नधान्यासह किराणा किट भेट दिले. यामुळे अनेकांना आधार झाला. त्यांनी पत्रकारांचाही सन्मान केला.
आज कोरोना सारख्या भयंकर महामारीशी संपूर्ण देश लढत असताना अशा कठीण काळात समाजातील अनेकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंब व घरदार सोडून महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या माध्यमातून समाजासाठी करीत असलेले सेवाकार्य हे अतुलनीय आहे. त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासकीय अधिकार्यांपासून ते थेट अंगणवाडी सेविका-परिचारिका यांना कोविडयोद्धा म्हणून सन्मानित केले.
जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे ,नायब तहसीलदार सुभाष कुंभार, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, मुख्याधिकारी राहुल पाटील, उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर ए सोनवणे, तालुका मलेरीया सुपरवायझर विठ्ठल माळी, आरोग्य सहाय्यक सुशीला चौधरी, फत्तेपूर आरोग्य अधिकारी डॉक्टर कुणाल बावस्कर, सहाय्यक फौजदार जयसिंग राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपक पोहेकर विजयानंद हॉस्पिटलचे डॉक्टर नंदलाल पाटील ,व विजया पाटील, बेटावद गावाचे आरोग्य सहाय्यक गोविंद लोखंडे, डॉक्टर ऐश्वरी राठोड ,चैतन्य हॉस्पिटल रावेर डॉक्टर समर्थ हॉस्पिटल डॉक्टर ,मनोज विसपुते, डॉक्टर स्वाती विसपुते, शेंदुर्णीचे आरोग्य सेवक शैलेंद्र नाथ थोरात, नेरी गावातील रमेश इंगळे, वाकडीचे रवींद्र सूर्यवंशी, गारखेडा येथील गोपाळ पाटील, फत्तेपुर भागातील वैशाली खंडारे, जामनेर शहरातील समन्वयक कुमारी अनुजा जयस्वाल ,यशोदा बाल रुग्णालयाचे डॉक्टर श्याम चव्हाण ,शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल निकम, फत्तेपुर येथील आरोग्य सेवक भागवत वानखेडे वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक सुनयना चव्हाण, शेंगोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक राजश्री पाटील, फत्तेपूर येथील आरोग्य सेविका अर्चना गवई ,शेंदुर्णी च्या आरोग्य सेविका शोभा घाटे, गारखेडा आरोग्य सहाय्यक पुंडलिक पवार, जामनेर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य सहाय्यक बशीर पिंजारी, ब्लॉक नर्सिंग ऑफिसर आशा कुयटे, वाकोद चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील, बेटावद चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील, रुग्णवाहिका चालक जालम सिंग राजपूत, पोलीस हवालदार रमेश कुमावत, नेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सारिका भोळे, मुक्ताई हॉस्पिटल चे डॉक्टर सुभाष शिंदे, पोलीस नाईक सुनील माळी खादगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विनोद भोई ,देऊळगाव गुजरी येथील स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर राठोड, व डॉक्टर कल्पना राठोड, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे ,डॉक्टर आर के पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्णवाहिका चालक नवनाथ वाघमारे, तहसीलच्या अव्वल कारकून मनोज सपकाळे , पहूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर हर्षल चांदा, सुरक्षारक्षक जगदीश भामेरे, लिपिक वीरेश शिवपुजे या सर्व कोरोना योद्धांना श्याम चैतन्य महाराजांनी सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
म्हणजे हा भविष्यातील कोरोना योद्ध्यांचे बळ आहे.अशाप्रकारे यांच्या सन्मानाबद्दल श्याम चैतन्य महाराजांनी सर्व कोविड योद्धांचे आभार व्यक्त केले….