<
जळगाव( प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिरात आज रक्षाबंधन निमित्ताने सुंदर माझी राखी हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा व राखी सजावट करून या उपक्रमात भाग घेतला. ज्या विद्यार्थ्यांची राखीची सजावट सुंदर आली ते या उपक्रमाचे मानकरी ठरले आहे. कृष्णा अहिरे, मयुरी अहिरे, भाविका सोनगडा, ऐश्वर्या बारी, आदित्य पाटील, पुनम पाटील, भावेश पाटील या उपक्रमाचे मानकरी ठरले आहे. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्यातर्फे ऑनलाइन बक्षीस प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी कौतुक केले. दरवर्षी शाळेतर्फे रिमांड होम, अनाथाश्रमातील मुलं, पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली जाते. पण सध्या शाळा बंद असल्या कारणाने ऑनलाईन रक्षाबंधन घेण्यात आले. यात बहीण भावाला ओवाळतांना सुंदर माझी राखी हा उपक्रम घेण्यात आला.