<
जळगाव, दि.13 – राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी 2 दुधाळ संकरीत गायी/ म्हशीचे वाटप करणे/अंशत: ठाणबध्द पध्दतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळ्यांसोबत 1 बोकड / 10 मेंढ्यांसोबत 1 नर मेंढा/ 1 हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती जमाती) या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनांतर्गत योजनेची ऑनलाईन पध्दतीने अंमलबजावणी करण्यासाठी 14 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 11 वाजता प्राथमिक लाभार्थी तर 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थ्यांची रॅन्डमायझेशन पध्दतीने अंतिम निवड जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील एन.आय.सी मध्ये जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवड करण्यासाठी सभेचे आयोजन केले आहे.
तरी इच्छूक अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.