<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ५२८ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज ३७५ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत १०६८० रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २९,(६५ RATI),भुसावळ ०२,(०६ RATI), अमळनेर ४१,(०९ RATI), चोपडा १०,(२० RATI),पाचोरा १३, (०४ RATI), भडगाव ४२,(०६ RATI), धरणगाव २३, (४० RATI),यावल ०६, (०२RATI), एरंडोल ५१,(००RATI), जामनेर ०१,(४९ RATI), जळगाव ग्रामीण ०९,(१० RATI), रावेर ०७, (०९ RATI), पारोळा ०१,(०९ RATI), चाळीसगाव ४४,(०१ RATI), मुक्ताईनगर ०२, (१२ RATI), बोदवड ००,(०३RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०१, (०१ RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५३९१ इतकी झाली आहे.आज ०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ६१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ४०९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.