<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता दहावी बारावीच्या गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दर्जी फाउंडेशनचे संचालक प्रा. गोपाल दर्जी तर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम. देवांग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनील पवार यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ विजय साखला यांनी केले. अध्यक्षीयभाषणात प्रा गोपाल दर्जी यांनी विदयार्थ्यांनी शिक्षणासोबतच प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.डी.एम. देवांग यांनी जीनगर युथ क्लब च्या कार्याचे मनोगतात कौतुक केले. मार्च २०२० च्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना जीनगर युथ क्लब तर्फे पाचशे रुपये व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. यात बारावी मध्ये प्रथम क्रमांक कुणाल योगेश सोनग्रा १२वी कॉमर्स, द्वितीय क्रमांक नेहा विजय राठोड १२वी कॉमर्स, तृतीय क्रमांक साहिल दिलीप साखला १२वी कॉमर्स, इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक दिव्या गोपाळ आसेरी ९१.२०% गुण, द्वितीय क्रमांक पार्थ अजय साखला ९१% गुण, तृतीय क्रमांक -राशी राजेंद्र परिहार ९०.२०% गुण यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी स्व.देवीचंदजी डाबी पुणे आणि स्व. मिश्रीबाई डाबी पुणे यांचे स्मरणार्थ प्रत्येकी एक हजार रुपये पुरस्कार इयत्ता दहावीच्या विद्यर्थ्यांना मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. कल्पक साखला, विजय राठोड, योगेश सोनग्रा, गोपाळ आसेरी, विजय साखला, दुर्गा परिहार, सुनीता आसेरी आदींची उपस्थिती होती.