<
जळगाव. दि. 13 – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात आजमितीला रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, मयताचे वारस नसल्याने/वारसांने विहित मुदतीत अर्ज सादर न केल्याने, नवीन तसेच विविध कारणांमुळे अकार्यान्वित रास्त भाव दुकानांचा जाहिरनामा प्रसिध्द करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
त्यानुसार 1 ऑगस्ट, 2017 च्या शासननुसार नवीन शिधापवाटप दुकान मंजूर करणेसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित केलेला असून त्यानुसार नवीन रास्तभाव/शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करण्यासाठी जाहीरनामा काढणे व प्रसिध्द करण्यात आला आहे. संस्थांना अर्ज करण्यसाठी 10 सप्टेंबर, 2019 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी/छाननी 10 ऑक्टोबरपर्यंत, नवीन दुकाने मंजुर करणे 25 ऑक्टोबर, 2019 अशी आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील नवीन रास्तभाव दुकान मंजुरीकामी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. जाहिरनामा संबंधित तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियिम व कायद्याच्या अतंर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या रास्तभाव/शिधावाटप दुकानसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तरी नवीन शिधावाटप दुकानासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागामार्फत एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.