<
बोदवड:सध्या जैन समाजा चे सर्वात महत्वाचे पर्व सुरु झाले आहे या पर्व साठी मुंबई येथील उद्योजक परिवारातील दीक्षा घेतलेले व 45 वर्ष दीक्षा ला झालेले प. पू. आचार्य कांती ऋषीजी म. सा. यांचे शिष्य प. पू. धर्मेंद्र ऋषी जी म. सा. यांचे बोदवड नगरीत आगमन झाले आहे. सध्या कोरोनाच्या महामारी मुळे गुरुदेवांचे घरूनच प्रार्थना सुरू आहे. सध्या कोरोनाच्या महामारी च्या संकटात प. पू. धर्मेंद्र ऋषीजीं हे बोदवड शहरात जय माता दी नगर मध्ये विजय खिवसरा यांच्या घरी विराजमान आहेत. चातुर्मास निमित्त गुरुदेव हे 24तासात फक्त एकच वेळ जेवण घेतात. पूर्ण जीवन भर हिरवा भाजीपाला त्याग केला आहे.
तर कधी कधी आठ दिवसाचे निरंकार उपवास ऋषीजी करतात. उपवासात ऋषीजी फक्त गरम पाणी घेतात.सर्व जैन बांधव हिरवा भाजीपाला लसण कांदे बटाटे या वस्तूचा त्याग करतात व संध्याकाळी सूर्यास्त अगोदर जेवण करतात व गुरुदेवा चे प्रार्थना करतात. तसेच जैन बांधव वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतात.