<
प्रतिनिधी – अमित जैन
बोदवड :-‘ कोरोना ‘विषाणूचा कहर रोखण्यासाठी जनता कर्फ्यू ला प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात 16 रोजी गांधी चौकात नगरपंचायत प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, व्यापारी यांची बैठक घेण्यात आली होती, बोदवड शहरात दि. 19 व 20 सप्टेंबर असे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक देण्यात आली. शहरात मेडिकल, दुध व वैद्यकीय सुविधा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती. बंद मुळे शहरात सर्व शुकशुकाट होता.