<
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव च्या वतीने सालाबादाप्रमाणे होणाऱ्या संघटनेच्या अधिवेशना बाबत तसेच कोरोना महामारी मुळे संघटनेच्या कामात आलेली मरगळ घालवण्यासाठी तसेच संघटनेच्या सभासद नोंदणी अभियान राबवण्याबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची चिंतन बैठक चारठाणा तालुका मुक्ताईनगर येथील वनविभागाच्या रेस्ट हाऊस मध्ये दी.26/09/2020 वार शनिवार रोजी पार पडली. या चिंतन बैठकीमध्ये कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अंतर्गत येणाऱ्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांनी राज्य स्तरावरून आलेल्या सूचनांची माहिती अवगत केली. तसेच कामाच्या ध्येय धोरणाची दिशा स्पष्ट केली. या चिंतन बैठकीत शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वनविभाग ,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभाग , तसेच इतर विभागांचे ही पदाधिकारी उपस्थित होते .