<
मान्यवरांचा सूर : जिल्हास्तरीय शाडू माती गणेशमूर्ती स्पर्धेचे पारिताेषिक वितरण
लहान गटात अमळनेरचा ओम लटपटे, माेठ्या गटात भुसावळची मिनल चाैधरी प्रथम
प्रतिनिधी | भुसावळ
पर्यावरण अाणि संस्कृती संवर्धनात अंतर्नाद प्रतिष्ठान महत्वाचा दुवा अाहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण हेरण्याचा वसा या संस्थेने जाेपासला असून ताे हेवा वाटावा असा अाहे, असा सूर मान्यवरांतून उमटला. गणेशाेत्सवात अाॅनलाइन शाडू माती गणेश मुर्ती स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या तीन गटातील १८ व सहभागी १४०० स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देऊन रविवारी गाैरवण्यात अाले, त्यात मान्यवरांनी हे विचार मांडले.
अध्यक्षस्थानी अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक परिक्षीत बऱ्हाटे, रोटरी रेल सिटी अध्यक्ष सुधाकर सनांसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंग रावळ, गणेशमूर्ती प्रशिक्षक रमाकांत भालेराव, माध्यमिक शिक्षक पतपेढी भुसावळ संचालक संजय भटकर, नुतन शिक्षक पतपेढी भुसावळ संचालक प्रदीप सोनवणे यांची उपस्थिती होती. स्पर्धक, पालक, प्रमुख पाहुणे आणि अंतर्नादच्या सर्व सदस्यांची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी करुन सॅनिटायझरचा वापर करुन आणि ही सर्व माहिती संकलित करूनच सर्वांना कार्यक्रम स्थळी प्रवेश देण्यात आला.जिवन महाजन यांनी गणपतीस्तोत्राचे सादरीकरण केले. भुसावळचे नगरसेवक निर्मल कोठारी, स्व. गोरख गजमल पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चाेपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढी भुसावळ संचालक प्रदीप सोनवणे यांचे सहकार्य उपक्रमाला लाभले. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी केले. शिंदी शाळेचे शिक्षक समाधान जाधव यांना जिल्हा परिषदेचा अादर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात अाला. कार्यक्रमासाठी फक्त विजेत्या स्पर्धकांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. सूत्रसंचालन अमित चौधरी यांनी केले. आभार जिवन सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी माजी ग.स.संचालक योगेश इंगळे, जिवन महाजन, प्रा. श्याम दुसाने, समाधान जाधव, भूषण झोपे, निवृत्ती पाटील, अमितकुमार पाटील, राजू वारके, मंगेश भावे, प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील, सहसमन्वयक सचिन पाटील, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
गटनिहाय विजेते
पहिला गट ( वय १ ते १३ )
प्रथम ओम प्रमोद लटपटे (अमळनेर), द्वितीय दर्पण दीपक कोल्हे (चिनावल ता.रावेर ), उत्तेजनार्थ सृष्टी चंदन पवार (चोपडा ), आदित्य चंद्रकांत जंगले (भुसावळ ), सत्यम घनश्याम पाटील (भुसावळ )
द्वितीय गट ( वय १४ ते २० )
प्रथम मिनल तुषार चौधरी ( भुसावळ ), द्वितीय देवाशिष गिरीश बडगुजर (जळगाव ), उत्तेजनार्थ ओमकार सचिन बिदाये ( भुसावळ ), वेदांत सुरेश पाटील ( तांदलवाडी ता.रावेर ), शिवराज अमितकुमार पाटील ( भुसावळ ), मृणाल विजय सोनार ( जळगाव ),यामिनी मिलिंद राणे (भुसावळ )
तृतीय गट ( वय खुला गट २१ च्या पुढे )
प्रथम अमोल भीमराव लोखंडे ( सावदा ता.रावेर ),द्वितीय अर्जुन महेंद्र चौधरी (भुसावळ ), उत्तेजनार्थ ज्योती अतुल महाजन (वरणगाव ), महेश निवृत्ती पाटील ( भुसावळ ), हर्षा हर्षल कोल्हे ( जळगाव ), मच्छिंद्र सखाराम भोई ( सावखेडा जळगाव ).