<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील एस.एस.मनियार विधी महाविद्यालयात दि.२४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व दि २ ऑक्टोबर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राज्यस्तरीय विविध स्पर्धा व सर्वेक्षण ऊपक्रम ई पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
यात घेतल्या गेलेल्या स्पर्धेत खालील रा.से.यो विद्यार्थी, विद्यार्थीनींना बक्षीसे मिळालीत.
डिंपल बऱ्हाटे रॅक १- फीट इंडिया फ्रिडम रन स्पर्धा. शिलरत्न जंजाळे रॅक २- लाॅकडाऊन काळातील माझ्यातील स्टार गायक.डिंपल बऱ्हाटे रॅक ३- लाॅकडाऊन काळातील फोटोग्राफी. त्यात प्रामुख्याने खालील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. दिनांक २४ रोजी लाॅकडाऊन (टाळेबंदी) काळातील सामाजिक संवेदना यात शिलरत्न जंजाळे व इतर रा.से.यो. विद्यार्थी व विद्यार्थीनींने वरणगाव ता.भुसावळ व अनेक ठिकाणी सॅनिटायझर व मास्क वितरीत केले.
दिनांक २५ रोजी लाॅकडाऊन काळातील माझ्यातील स्टार गायक यात समृद्धी अंबीकर, शिलरत्न जंजाळे व इतर विद्यार्थी व विद्यार्थीनींने सामाजिक जनजागृती व प्रबोधन या विषयावर सुमधूर गाणे गायले.
दिनांक २६ रोजी लाॅकडाऊन काळातील माझ्यातील कवी, यात किमया देशमुख व इतर विद्यार्थी व विद्यार्थीनींने सामाजिक जनजागृती व प्रबोधन या विषयावर कविता सादर केली.
दिनांक २७ रोजी एकपात्री प्रयोग स्पर्धा सामाजिक अंतर यांचे महत्त्व विशद करणारा एक प्रयोग चैताली देशमुख व इतर विद्यार्थीनी यांनी सादर केला.
दिनांक २८ रोजी फीट इंडिया फ्रिडम रन यात दीपक दुबे व इतर रा.से.यो विद्यार्थ्यांनी ३.२ कि.मी रनिंग केली व डिंपल बऱ्हाटे व इतर रा.सो.यो विद्यार्थीनींनी ३ किमी सायकलींग केली. या सर्वांनी जिपीएस रनिंग ट्रॅकर अॅपचा वापर केला.
दिनांक २९ रोजी वक्तृत्व स्पर्धा यात चैताली देशमुख व इतर विद्यार्थी, विद्यार्थीनींनी कोव्हीड १९ नंतरचे जग या विषयावर भाषणे केलीत.
दिनांक ३० रोजी लाॅकडाऊन काळातील फोटोग्राफी यात डिंपल बऱ्हाटे व इतर रा.से.यो. विद्यार्थीनींनी तापी नदीच्या तीरावर एक तेजवंत सुर्याचे विहंगम दृष्य टीपण्याचा प्रयत्न केला.
दिनांक १ रोजी पोस्टर, रांगोळी, कोलाज, क्ले मेकींग स्पर्धा यात चैताली देशमुख, किमया देशमुख, आकांक्षा शर्मा, कोमल मोहता व इतर रा.से.यो. विद्यार्थीनींनी कोव्हीड या विषयावर सुंदर पोस्टर, मनमोहक रेखीव रांगोळ्या व इतर ऊपक्रम केले.
दिनांक २ रोजी सत्याग्रह ते स्वच्छाग्रह यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्याग्रह सोबत आजच्या काळाची गरज म्हणून स्वच्छतेचा आग्रह विद्यार्थांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली. यात रा.से. यो.चैताली देशमुख, किमया देशमुख, कल्याणी जोशी, आकांक्षा शर्मा, कोमल मोहता या व इतर विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीततेसाठी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. युवाकुमार रेड्डी, रा.से.यो.समन्वयक डाॅ रेखा पाहूजा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच कु.चैताली देशमुख बीएएलएलबी ५ वर्ष हीचे विशेष सहकार्य लाभले.