<
जामनेर(प्रतिनिधी)-अभिमान झाल्टे
जामनेर पंचायत समितीतील प्रभारी राज्य संपुष्टात येऊन जामनेर पंचायत समितीचा गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार श्रीमती जे व्ही कवडदेवी यांनी स्वीकारला आहे.
यावेळी त्यांनी विविध विभागाच्या आढावा बैठका घेतल्या व योजनांची माहितीही दिली.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांचा विकास करणे शक्य आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अभिसरणातून मुलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिसरणाच्या माध्यमातून करायच्या कामाचा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करणं आवश्यक असल्याचे जे व्ही कवडदेवी गटविकास अधिकारी यांनी सांगितले.
तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून लोक सहभागातून सदर आराखडे तयार करण्यात यावेत व मासिक सभेच्या मंजुरी ने सदर आराखडे पंचायत समितीकडे सादर करण्यात यावेत.ग्रामपंयतीवर जर प्रशासकाची नेमणूक झाली असेल तर प्रशासक व ग्रामसेवक यांनी गावातील सर्व घटकांशी विचार विनिमय करून गावातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व समावेशक असा आराखडा तयार करावा.
या वर्षीच्या आराखड्यात समाविष्ट नसलेली परंतु आवश्यक असलेल्या कामांचा यावर्षीच्या पुरवणी आराखड्यात समावेश करण्यात यावा.आपले गाव आपला विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुध्दा सुरू झालेली आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा हा आपला गाव आपला विकास आराखड्याचा भाग असला तरी आपला गाव आपला विकास आराखड्यातील सर्व प्रस्तावित सर्व कामांचा नरेगा आराखड्यात प्राधान्याने समावेश करावा परिणामी चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचा पैसा व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कुशल व अकुशल निधी यांच्या अभिसरणातून ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे शक्य होईल.गावाच्या गरजेच्या व विकासाच्या दृष्टीने सर्व कामांचा नरेगा आराखड्यात समावेश केल्यास नरेगाच्या अभिसरणातून विकास कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे शक्य आहे.
नरेगाचा आराखडा तयार करतांना गावाला वेगवेगळ्या माध्यमातून प्राप्त होऊ शकणा-या सर्व प्रकारच्या निधीही विचारात घेतल्यास आराखडा सर्व समावेशक व वास्तव वादी होईल.यामध्ये प्रामुख्याने ग्रामनिधी, दलितवस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना,ठक्करबाप्पा योजना, मुलभूत सुविधा,25:15, जिल्हा नियोजन निधी, स्थानिक लोक प्रतिनिधींचा विकास निधी , लोकसहभाग आणि उद्योगांचा सामाजिक दायित्व निधी यांचा समावेश करावा.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेत अभिसरणाच्या माध्यमातून 29कामे करता येतात.
नरेगाच्या आराखड्यात विकास कामांचा समावेश झाल्यानंतर मासिक सभेच्या ठरावासह संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडे अंदाज पत्रकाची मागणी करावी.अंदाजपत्रक तयार झाल्या नंतर संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडून(प्राधिकृत अधिकारी) तांत्रिक मान्यता दिली जाते.तांत्रिक मान्यतेमध्ये नरेगाचा अकुशल निधी (part1), कुशल निधी (part2) आणि इतर योजनांचा निधी(part3) यांची विगतवारी दिलेली असते.
तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कामाला गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात.25लाख रुपयांपर्यंतच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार गटविकास अधिकारी यांना वर्ग करण्यात आले आहेत.प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर संबंधित कामाची प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता यांचे जावक क्रमांक secure software ला टाकून काम ऑनलाईन केले जाते.
चार ते पाच दिवसांत सदर काम संबंधित T.P.O. च्या लाॅग इनला दिसतं.त्यानंतर संबंधित T.P.O.सदर कामाचे geotagging करतात व काम सुरू करता येते. सर्व प्रथम मजूरांचे मस्टर टाकून अकुशल निधी मंजूरांच्या खात्यात वर्ग केला जातो.मजूरांनी प्रत्यक्षात केलेलं अकुशल काम व मस्टरच्या माध्यमातून निघालेला अकुशल निधी यावर देखरेख ठेवण्याचे काम .T.P.O. यांचे आहे.
अकुशल कामाच्या प्रमाणात कुशल निधी secure system ला generate होतो.त्यानंतर T. P.O. नी प्रत्यक्ष झालेल्या कामाचे मूल्यांकन केल्यानंतर व संबंधित ग्रामपंचायतीनी देयके (वस्तू व सेवा करासह) सादर केल्यानंतर कुशल निधीसाठी fto generate केले जातात व F.T.O. clear होताच कुशल निधी ग्रामपंचायतीच्या नरेगाच्या बॅंक खात्यात जमा होतो.
नरेगाचा कुशल व अकुशल निधी वर्ग झाल्यानंतर इतर योजनांचा निधी ग्रामपंचायतीच्या नरेगा खात्यात वर्ग करण्यात यावा व त्यातून पुढील खर्च करावा म्हणजे भविष्यात audit च्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर कामांचे अंतिम मूल्यांकन करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अभियंत्यांची राहील.अंतिम मुल्यांकन सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडे निधी ची मागणी करता येईल व निधी प्राप्त होताच निधी विहीत प्रक्रियेनुसार नरेगा खात्यातून काढता येईल.सदर काम हे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचेच काम आहे असे समजण्यात येते व सदर कामामध्ये ठेकेदाराची नेमणूक करण्याची कुठलीही तरतूद नाही.