Saturday, July 12, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशीपबाबत विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशीपबाबत विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना


जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) – जळगांव जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्याना कळविण्यात येते की, सन 2018-19 व सन 2019-20 मध्ये अनूसूचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्याचे महाडिबीटी प्रणालीवरील Pool Account वर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. सदरचे अर्ज 15 दिवसात निकाली काढावयाचे आहेत. याबाबत महाविद्यालय स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करुन अर्ज Pool Account वरुन निकाली काढण्यात यावे. तसेच महाडिबीटी प्रणालीवर महाविद्यालय स्तरावर त्रुटीअभावी प्रलंबित असलेले अर्ज त्रुटीपूर्तता करुन जिल्हास्तरावर पाठविण्यात यावे.
त्यानुषंगाने कळविण्यात येते की, महाडिबीटी पोर्टलवरील सन 2018-19 व सन 2019-20 मधील मंजूर विद्यार्थ्याची व महाविद्यालयाची पी.एफ.एम.एस.प्रणालीव्दारे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा न होण्याची कारणे खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. त्याप्रमाणे पडताळणी करुन सदर विद्याथ्याचे व महाविद्यालयाची सन 2018-19 व सन 2019-20 मधील रक्कम तात्काळ वर्ग करण्याकामी योग्य ती काळजी घेण्यात यावी.


विद्यार्थ्यांसाठी सूचना-


अनुसूचित जाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरत असतांना आधार नोंदणीकृत अर्ज भरणे आवश्यक आहे. सन 2018-19 व 2019-20 मध्ये ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नॉन आधार अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये जावून आधार क्रमांक तसेच आधार संलग्नीकृती बँक खात्याची माहिती अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहे की नाही याची पडताळणी/खातरजमा आधार पोर्टल http://resident.uidai.gov.in/bank-mapper या लिंकवर जावून करावी, तसेच आधार ॲक्टीव्ह आहे किंवा कसे याबाबत देखील सदर पोर्टलवरून खातरजमा करावी. विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टवरील प्रणालीव्दारे निर्गमित झालेले पेमेंट व्हाऊचर विद्यार्थ्यी लॉगीनमध्ये जावून त्वरीत रीडीम करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला युजर आयडी व पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. महाडिबीटी प्रणालीमध्ये नोंदणीकृत होत असतांना जे लॉगीन आयडी विद्यार्थ्यांने तयार केलेला आहे तोच लॉगीन आयडी विद्यार्थ्यांने कायमस्वरूपी लक्षात ठेवून वापरावा. जेणेकरून भविष्यात याबाबत कोणाताही लॉगीन आयडी दुबार तयार होणार नाही तसेच आपला लॉगीन आयडी व पासवर्डची माहिती गोपनीय ठेवल्यास याचा दुरुपयोग होणार नाही.


महाविद्यालयांसाठी विशेष सूचना-


महाविद्यालय स्तरावरील Scrutiny पर्यायाचा वापर करून प्रलंबित अर्ज फॉरवर्ड करत असतांना प्रणालीमध्ये दर्शविण्यात आलेल्या सर्व बाबींची खात्री करून तपासूनच पात्र अर्ज मंजूरीकरीता विहित मुदतीत जिल्हा कार्यालयास प्रणालीव्दारे ऑनलाईन पाठविण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्यी व महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळालेला आहे त्यांनी दुसऱ्या हप्त्याकरीता महाविद्यालय लॉगीन मधून व्दितीय सत्राची उपस्थिती अद्ययावत करूनच अर्ज मंजूरीकरीता विहित मुदतीत पाठवावेत. महाविद्यालयाच्या लॉगीनमध्ये “ALLOTMENT DATE WISE REPORT” या पर्यायाचा वापर करून अर्ज ALLOTE झाला की नाही, याची महाविद्यालयाने वेळोवेळी पडताळणी करणे आवश्यक आहे व NOT ALLOTED अर्जाबाबत त्रुटी पुर्तता करणेसाठी संबंधीत विद्यार्थ्यांला त्वरीत याबाबत अवगत करावेत. महाविद्यालयांना संबंधीत लॉगीनमधील DBT DASHBOARD या पर्यायाचा वापर करून शिष्यवृत्तीबाबतचा महाविद्यालय निहाय तपशिलवार अहवाल दिसून येतो. महाविद्यालय लॉगीनमध्ये Institute Disbursement Report, Student Disbursement Report व Status Wise Application Detail Report या तीनही पर्यायामध्ये विद्यार्थ्यी व महाविद्यालय यांना शिष्यवृत्ती वितरण झालेल्या स्थितीचा अहवाल दिसून येतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनमध्ये Support Desk मध्ये अर्ज क्रमांकनिहाय (Search) शोध घेतल्यास अर्ज क्रमांकाला क्लिक केल्यानंतर सदर अर्जावर झालेली कार्यवाही विद्यार्थ्यी व महाविद्यालयाला मिळणाऱ्या व मिळालेल्या रक्कमेचा तपशील अर्जासंबंधीत PFMS पोर्टलबाबत त्रुटीची माहिती महाविद्यालय लॉगीनमध्ये विद्यार्थ्यीनिहाय प्रणालीमध्ये दर्शविण्यात येत आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे आधार अथवा बँक खात्यावरील त्रुटी असल्यास संबंधीत विद्यार्थ्याला त्वरीत याबाबत अवगत करावे.
विद्यार्थ्यी व महाविद्यालयांना महाडिबीटीपोर्टलवरील पडताळणीबाबत तक्रार करण्यासाठी Grievance/ Suggestion या पर्यायाचा वापर करावा.
उपरोक्त दिलेल्या सूचनांचा व बँक खाते आधार संलग्नीकृत करावयाच्या पर्यायांचा वापर करुन विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी तात्काळ अवलंब करुन प्रलंबित असलेली शिष्यवृत्तीची अदायगी त्यांच्या बँक खात्यामध्ये करुन घ्यावयाची आहे. याची विद्यार्थी व महाविद्यालय यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

शनिवार, रविवार दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी सकारात्मक!जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : मनपा आयुक्तांशी करणार चर्चा

Next Post

महापौरांच्या उपस्थितीत मनपातील नवीन लिफ्टची चाचणी!

Next Post
महापौरांच्या उपस्थितीत मनपातील नवीन लिफ्टची चाचणी!

महापौरांच्या उपस्थितीत मनपातील नवीन लिफ्टची चाचणी!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications