<
जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) – सर्वसामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी दिनांक 6 ते 12 ऑक्टोबर, 2020 हा सप्ताह माहितीचा अधिकार सप्ताह म्हणून साजरा करणेबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने समाजकार्यकर्त्यांकरिता व इच्छुक गटाकरीता भीत्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला आदि उपक्रमांचे आयोजन करावे. या उपक्रमांसाठीच्या पारितोषिकांची व्यवस्था लायन्स क्लब, रोटरी क्लब यासारख्या विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करण्यात यावी.
6 ते 12 ऑक्टोबर, 2020 हा सप्ताह माहितीचा अधिकार सप्ताह म्हणून साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. सदर सप्ताह साजरा करीत असतांना कोविड-19 बाबतच्या शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात यावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.