<
जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) – जळगांव जिल्ह्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविण्यात येते की, सन 2017-18 व त्यापुर्वीच्या शैक्षणीक वर्षातील मंजूर केलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती/ फ्रिशीप योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता शासनाकडून अन्वेषण प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावयाचे असल्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असतील त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आयुक्तालयाकडून पुरविण्यात आलेल्या विहीत नमुन्यात (परिशिष्ठ-अ,ब,क,) नमुन्यात आयुक्तालयास दिनांक 24 ऑक्टोबर, 2020 पर्यंत सादर करावे. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.
त्यानुसान पुरविण्यात आलेल्या नमुन्यात परिशिष्ठ- ‘क’ (रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन) वर्षनिहाय सन 2017-18 व त्यापूर्वीच्या शैक्षणीक वर्षातील प्रलंबित अर्जांची माहिती सादर करावयाची आहे. प्रलंबित विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेचे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावयाची मुदत ही अंतिम असून, यापुढे महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार नाही. याची सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संबंधीत संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनी नोंद घ्यावी.
अन्वेषण प्रमाणपत्र शासनाकडून तातडीने प्राप्त करुन सदरहू शिष्यवृत्ती/ फ्रिशीपचे प्रलंबित अर्ज निकाली काढणेबाबत कोणत्याही स्वरुपाचा हलगर्जीपणा, टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करण्यात येवू नये याची गांर्भीयाने नोंद घ्यावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.