<
जळगाव-(प्रतिनिधी) -येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाने विविध उपक्रम राबवून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केला.त्यात पर्यावरणपूरक राख्या तयार करणे , बाल निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना राख्या बांधणे तसेच त्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणास मदत करणे असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
सर्वप्रथम बाळ निरीक्षण गृह उपअधीक्षक डिगंबर पाटील यांच्या उपस्थितीत निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थिनींनी राख्या बांधून निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना एका अतूट नात्याची ओळख करून दिली त्यानंतर वही व पेन यांचे वाटप करण्यात आले.
शाळेत सुद्धा विद्यार्थिनींनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तर मुलांनी आपल्या बहिणींनी वेगवेगळे उपहार देऊन आभार मानले.कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव , स्वाती पाटील यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर यशस्वीतेसाठी सूर्यकांत पाटील ,सुजाता फालक ,सरला पाटील ,कल्पना तायडे ,दीपाली चौधरी ,सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.