<
जामनेर /प्रतिनिधि :-अभिमान झाल्टे
कोरोना मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा नोडल अधिकारी एवं उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशान्वये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस. पाटोडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण ,तहसीलदार अरुण शेवाळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पहुर येथील खासगी दवाखान्यांमध्ये ग्रामीण रुग्णालय , पहूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ,वाकोद यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत . या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .
कोरोना नियंत्रणासाठी पहूर येथे ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ,वाकोद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रमेश पाटील ,डॉ. रवींद्र बडगुजर , डॉ. सचिन भडांगे ,डॉ. जितेंद्र घोंगडे , डॉ . डी. एन .पाटील , डॉ .वसीम शेख , डॉ .रियाज देशमुख आदींच्या रुग्णालयांमध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या उपस्तीत कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत .यासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .जितेंद्र वानखेडे , वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र जाधव ,आरोग्य पर्यवेक्षक अशोक सुरडकर , विजु पांढरे यांच्यासह वैद्यकीय टीमचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे .या उपक्रमामुळे बाधितांचे योग्यवेळी निदान होऊन योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.तसेच तालुक्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मदत होणार आहे. पुढील काही दिवस खाजगी डॉक्टरांच्या दवाखान्यात 50% रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.