<
मुंबई, दि. 25 : दिव्यांग व्यक्तींमध्ये कृषी विभागातील योजनांची माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.
दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता डी एम दिवेकर – यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/dcz4FiEF59g या लिंकचा वापर करावा.
दुपारी 12.15 वाजता फळबाग लागवड व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता धनश्री जाधव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता या https://youtu.be/VujVS89SeLY लिंकचा वापर करावा.
दुपारी 3 वाजता राष्ट्रीय कृषी विकास योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता यशवंत केजळे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/Me5eWq1ygho या लिंकचा वापर करावा.
दुपारी 3.45 वाजता कृषी प्रक्रिया किसान संपदा योजनेंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठी पायाभूत सुविधा निर्मिती व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता सत्यवान वराळे – यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/4wW1RGGr8KQ या लिंकचा वापर करावा.
तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्या यूट्यूब चॅनलला भेट द्यावी.