<
जळगाव-भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.या सणाचे औचीत्त्य साधून आज प्रगती विद्यालयात राक्षबांधन हा सण मुलांनी टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत बनविलेल्या राख्या यांचा उपयोग करून साजरा केला. या धर्तीवर शाळेच्या मैदानावर विशाल राखीची प्रतिकृती विध्यार्थ्यांच्या साहाय्याने बनविण्यात आली व राखीचे महत्व सांगण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन शिक्षक मनोज भालेराव मार्गदर्शन मुख्याध्यापक शोभा फेगडे व ज्योती कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी मुख्याद्यापक शोभा फेगडे, ज्योती कुलकर्णी, मनीषा पाटील, शिक्षक मनोज भालेराव, रमेश ससाणे, पंकज नन्नवरे, सुवर्णा शिराळकर तसेच विजय चव्हाण आदी यांनी परिश्रम घेतले.