<
ईशान्य मुंबई जिल्हा जनता दल सेक्युलर पक्षातर्फे भांडुप पश्चिम येथे दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या रवा, मैदा, साखर, बेसन, पोहे आदी साहित्याची स्वस्त दरात विक्री सुरू करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी पक्षाच्या गावदेवी रोड येथील कार्यालयात या विक्रीचा पक्षाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंदन, जिल्हा सरचिटणीस प्रवीण क्रॅस्टो, उपाध्यक्ष सुशीलकुमार सावळे, युवा कार्यकर्ते केतन कदम, सविता गणेश जाधव, कविता जाधव, उर्मिला आर. बिलांगे, पुष्पा कांबळे, शिला तोरगे, अनुपमा सिदार्थ ठावरे, सुशिल कुमार साबळे, ऑदुरंज दिगाबर ओहे, प्रतिमा राऊत, प्रविण कास्टो, रविंद्र विलांगे, कांचन पागडे, शुभम पवार, अक्षय मांजरेकर, अक्षय शेट्टी, संतोष गायकवाड, हारशेत मांजरेकर, गणेश चोपडेकर, महेश कांबळे, तुशात साळबे, मनिष देरे, विशाल, शाही राणे, प्रतिमा कांबळे, असल, स्वप्निल, हिरण कुटे, विवेक देरे, तुषार, अशिष आरडले, कल्पेश, अनुशु, रविंद्र ,रोहित पवार, सागर माजरे, योगेश झेडे, उमेश पवार आदींच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना, जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंदन यांनी, कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून पक्षाने भांडुप पश्चिम परिसरात केलेल्या मदत कार्याची माहिती दिली.
कोरोनाच्या भीतीने राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी घाबरून घरात बसले असताना, ईशान्य मुंबई जनता दलाने अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या सहा सात महिन्यात पक्षाने दोन हजारांहून अधिक कुटुंबांना मोफत धान्य वाटप केले, अडीच हजार कुटुंबांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पाच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले तसेच पोलिस, अन्य शासकीय कर्मचारी यांना मास्क, सॅनिटाइजर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नोकरी, रोजगार गमावल्यामुळे आज अनेक कुटुंबांसमोर दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच पक्षाने दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची स्वस्त दरात विक्री सुरू केली असल्याची माहितीही श्री. संजीवकुमार यांनी यावेळी दिली. मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी यावेळी पक्षाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत केले. अडचणीच्या काळात जे जनतेच्या मदतीला उभे राहतात तेच जनतेचे नेतृत्व करू शकतात, असे सांगून संजीवकुमार सदानंदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज भांडुपवासीयांचा विश्वास संपादन करण्याचे काम केले आहे. स्थानिक जनतेला आज जनता दल, आपला पक्ष वाटू लागला आहे,असे श्री. नारकर म्हणाले.
यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.