<
जळगाव, दि. 14 – महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे महिला आर्थिक विकास महामंडळाला कापडी पिशव्या शिवण्याचे काम देण्यात आलेले होते. त्यानुसार जिल्हास्तरांवर बचत गटातील महिलांमार्फत कापडी पिशव्या शिवून घेण्यात आलेल्या आहेत. सदर पिशव्या जिल्हाधिकारी यांचेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
दिनांक 15 ऑगस्ट, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक तत्वावर पिशव्या वाटप करण्यात येणार आहेत. असे शेख अतिक, जिल्हा समन्वयक अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.