<
जळगाव – संविधान जागर समिती जळगाव यांचे विद्यमाने संविधान दिन उत्साहात संपन्न झाला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद भाऊ सपकाळे व अमोल कोल्हे यांनी माल्यार्पण केले. संविधान दिनानिमित्त मुकुंद भाऊ सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित संविधान निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले व 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान भारताचे राष्ट्रपती यांना अर्पण करण्यात आले… संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली… भारत देश प्रजासत्ताक संसदीय लोकशाही प्रणित सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले असे ते म्हणाले… संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले… आभार प्रदर्शन प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले… यावेळी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या… या प्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला सोनवणे, भावना जैन, प्रतिभा भालेराव, मोना सपकाळे, मराठा युवा महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत मोरे, किरण ठाकूर, ऋषिकेश जाधव, अमेय कुलकर्णी, भैय्या पाटील, गणेश गवळी, सौरभ बोरसे, संविधान जागर समितीचे भारत ससाणे , समाधान सोनवणे, नाना मगरे, गौतम सोनवणे, आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार. माळी महासंघाचे अध्यक्ष शालिग्राम मानकर, प्रकाश महाजन, वसंत पाटील, मराठा सेवा संघाचे खुशाल चव्हाण, संजय पाटील, लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे, कलिंदर तडवी, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे, आकाश सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बागरे, ऍड. राजेश गोयर, बाबुराव वाघ लिलाधर तायडे अशोका ब्रिगेडचे संजय तांबे, रमेश सोनवणे, कास्ट्राईब चे चंदन बिऱ्हाडे, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप भाऊ सपकाळे, फारुक शेख, फईम पटेल इत्यादी विविध संघटना व संस्थांचे प्रतिनिधी तसेच संविधान प्रेमी नागरिकांची सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.