<
जळगाव – (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून 10 डिसेंबर हा दीन साजरा करण्यात आला त्या वेळी आपल्या भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद चे जिल्हा कार्यालयात मोजक्या कार्य कर्त्या सोबत कोरोना सदृश परिस्थिती लक्षात घेऊन सोशल दिस्तेन्सींग चे पालन व मास्क लाऊन मोजक्या कार्यकारिणी ला बरोबर घेऊन आजच्या दिवसाचे महत्व काय, समाज कार्य कसे करावे, पदाधिकारी चे समस्या कामात येणारे व्यत्यय, व या सर्व बाबी लक्षात घेऊन संघटित राहण्याची गरज, तसेच संघटनेचे महत्व, संघटना वाढबरोबरच इतर महत्वाचे मुद्या बाबत चर्चा करणेत आली. त्या वेळी अध्यक्ष स्थानी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव मनोहर चौधरी हे होते. तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शेषराव पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भगवान मराठे, उत्तर महाराष्ट्र महासचिव दीपक सावळे, जलगाव जिल्हा प्रभारी अमरसिंग बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील, धरणगाव तालुकयातील उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ( नाना भाऊ) सोनावणे, एरंडोल तालुका अध्यक्ष विलास पाटील, धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी, शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज बोरसे, इत्यादी उपस्थित होते, अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र महासचिव यांनी वरील प्रमाणे मार्गदर्शन पर भाषण व मनोगत व्यक्त केले, तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, उपाध्यक्ष,महासचिव यांनी आपले मनोगत व कामातील अडी अडचणी बाबत चर्चा करून सर्व पदाधिकारी ना गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, व मानवाधिकार रक्षा करने करिता आम्ही सर्व सदैव प्रयत्न करू व संघटना अजून मजबूत करू असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.