<
पुसद -(प्रतिनिधी) आज दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी विध्यार्थी बिरसा ब्रिगेड,समाजकार्य विध्यार्थी संघटना,प्रहार विध्यार्थी संघटना,अखिल भारतीय नौजवान सभा,पुसद,मौलाना आझाद विचार मंच,पुसद या सर्व संघटनांनी संयुक्त रित्या विध्यार्थी परिषेदेच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्यात याव्या यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मख्यमंत्र्याना निवेदन दिले. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 नुसार विध्यार्थी परिषदेच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व महाविद्यालयांना देण्यात आले होते त्यानुसार निवडणूक कार्यक्रमाच्या तारखा निश्चित झाल्या होत्या व महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थी कामाला लागले असतांना अचानकपणे राज्यसरकारने 7 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थी परिषेदेच्या निवडणुका पुढे ढकलून नोव्हेंबर मंध्ये कोणतेही करण न देता घेण्याचे ठरवले त्यामुळे विद्यार्थी नाराज झाल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध वरील विद्यार्थी व युवक संघटनांनी केला आहे.
विद्यार्थी निवडणुका घेण्याची कालावधी पूर्वी ठरवलेल्या वेळेतच योग्य असून नोव्हेंबर मंध्ये घेतल्यास विध्यार्थ्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे या निवेदनातून मुख्यमंत्र्याना सूचित करण्यात आले आहे.
निवेदन देताना प्रहार विध्यार्थी संघटना,विद्यार्थी बिरसा ब्रिगेड, समाजकार्य विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय नौजवान सभा,पुसद,मौलाना आझाद विचार मंच,पुसद
या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्तीत होते.