<
अध्यापनकार्य, समाजसेवा, स्वातंत्र्ययुद्ध, साहित्य अशा बहुविध क्षेत्रात साने गुरुजींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी यांनी सांगितले.
समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साने गुरुजी जयंती निमित्त काव्यरत्नावली चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारी हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी डॉ. मिलींद बागुल यांनीही साने गुरुजींच्या कार्याला उजाळा दिला.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण,प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, प्रा. प्रकाश महाजन, युवराज सोनवणे, शालिनी सैंदाणे,कमल सोनवणे, निवृत्तीनाथ कोळी, संतोष मराठे, ज्योती राणे, गोविंद पाटील,
पुष्पलता कोळी, अरुण वांद्रे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. डी. कोळी यांनी केले. भास्करराव चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.