<
लॉकडाउन संपले मात्र अजूनही चित्रपट इंडस्ट्री रुळावर आलेली नाही . अजूनही थेटर्स पूर्णपणे उघडले नाहीत त्याच बरोबर चित्रपट निर्माते सुद्धा एवढ्या लवकर आपले चित्रपट प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे थेटर मध्ये लावायला धजावत नाही आहेत . मात्र या काळात सुद्धा वेबसेरीज मोठ्या प्रमाणावर बनत आहेत आणि वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना घरच्या घरी पहायला मिळत आहे . सध्या मराठी मध्ये एक खुप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणारया गोष्टीवर एक नवीन वेबसीरीज बनत आहे . त्यात मुख्य भूमिकेत आहे , प्रेक्षकांची आवडती आणि लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे . तिच्या सहकलाकराचे नाव अजुन ओपन झाले नसले तरी मराठी चित्रपट सृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता तिच्या सोबत या वेब सीरीज मध्ये काम करत आहे. ओपनिंग फ्रेम मिडिया या निर्मिति संस्थे द्वारे या वेब सीरीज चे दिग्दर्शन स्ट्रॉबेरी शेक फेम दिग्दर्शक शोनिल यल्लत्तीकर करत आहेत .
कोरोना काळात मोठ्या चित्रपटाचे शूटिंग अजुन तेवढ्या प्रमाणात सुरु झाले नसले तरीही लहान चित्रपट किंवा वेब सीरीज यांचे शूटिंग जे कमी टीम आणि कमी लोकेशन वर आणि मुख्य म्हणजे सर्व नियम पाळून होउ शकते ते सुरु झाले आहे . ऋता तिच्या वेबसेरीज च्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाली , ’ डुएट ‘ हे माझ्या पहिल्या वेबसीरीजचे नाव आहे आणि मी खूपच एक्साइट आहे . मुख्य म्हणजे ही आजची गोष्ट आहे . अदितीचे माझे पात्र खुप खरे आहे असे पात्र आजवर मी कधीच केलेले नाही . आनंद म्हणजे स्ट्रॉबेर्री शेक च्या टीमबरोबर पुन्हा मी काम करत आहे. कोविड नंतर मनासारखं काम मिळेल की नाही या चिंतेत असतानाच ‘डुएट’ च्या मार्गे मनसारखं काम करायला मिळणे माझ्यासाठी खुप भाग्याचे आहे . आम्ही कोविड चे सर्वच नियम पाळत ७ महिन्यांनी शूट करत आहोत आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आम्हा सर्वांमध्ये आहे . मी केलेल्या इतर सर्व भूमिकांप्रमाणे अदितीची भूमिका सुद्धा तुम्हाला आवडेल ही आशा करते . निर्मिति संस्थेची वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म बरोबर बोलनी सुरु असून लवकरच तुम्हाला ही वेबसिरिज ओटीटी प्लेटफार्म वर पहायला मिळेल . ‘