Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चेतना पदयात्रेचे ३१ रोजी आयोजन ; सहभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ३१ डिसेंबर २०२० रोजी व्यसनमुक्ती चेतना पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यातून शहरासह ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी मद्य प्राशन करण्याचे प्रमाण दरवर्षी आढळून येत आहे. यात तरुणांचे प्रमाण मोठे आहे. व्यसनांमुळे घरादाराची राखरांगोळी होते. मानसिक, शारीरिक, आर्थिक पतनामुळे मनुष्याचा विवेक नष्ट होतो. म्हणून व्यसनाला बदनाम करण्यासाठी चेतना पदयात्रा शहरातून ग्रामीण भागात काढण्यात येणार आहे.

शिवतीर्थ मैदानातून सकाळी ८ वाजता हि पदयात्रा निघून ती टॉवर चौक, घाणेकर चौक, भिलपूरा चौक, ममुराबाद नाका, ममुराबाद, विदगाव मार्गे रिधुर निघून तेथील अवचित हनुमान मंदिर येथे समारोप होणार आहे. या पदयात्रेत सुमारे २५ जण सहभागी होणार आहेत. मार्गामध्ये विविध ठिकाणी व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार असून त्याद्वारे समुपदेशक व चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते हे मार्गदर्शन करणार आहेत.

या पदयात्रेला सदिच्छा देण्यासाठी सकाळी ७ वाजता प्रवीण पाटील फौंडेशन, जनमत प्रतिष्ठान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगाव यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पदयात्रेत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी ३१ रोजी सकाळी ७ वाजता शिवतीर्थ मैदानावर उपस्थिती द्यावी असे आवाहन चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वेब सीरीज चा आहे जमाना ! अभिनेत्री ऋता दुर्गुळे ची पहिली वेबसिरिज ‘ डुएट ‘

Next Post

माननीय राज्यपाल महोदयांकडून डॉ . नरेंद्र ठाकूर सन्मानित !

Next Post
माननीय राज्यपाल महोदयांकडून डॉ . नरेंद्र ठाकूर सन्मानित !

माननीय राज्यपाल महोदयांकडून डॉ . नरेंद्र ठाकूर सन्मानित !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo