<
एरंडोल(प्रतीनिधी)- तालुक्यातील गालापुर येथील
आदिवासी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन संपन्न झाला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी कवायत घेतली, सर्व पालक सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने बिस्कीट चॉकलेट वाटप करण्यात आले,बालरक्षक व मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी सर्वांना एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शपथ दिली. तसेच तंबाखू मुक्ती ची व मूल्यवर्धनदेखील शपथ उपस्थितांना दिली. राज्य समता विभाग करीत असलेल्या कार्याची व बालरक्षक चळवळ ची संपूर्ण जाणीव करून दिली व स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक निष्ठेने व राष्ट्रभक्तीने निस्वार्थपणे कार्य केल्यास आपला देश जगाच्या पाठीवर लवकरच महासत्ता होईल असे किशोर पाटील कुंझरकर यावेळी बोलताना म्हणाले.कालच सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश शासनाच्या समग्र शिक्षा अभियान शालेय योजनेतून मिळाल्याने त्यांच्या मनाचा आनंद, त्याच जोडीनं टप्प्याटप्प्याने होत असलेल्या शाळा विकास पाहून मन तृप्त झाले. आदिवासी वस्तीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागील तीन वर्षापासून किशोर पाटील कुंझरकर करत असलेली प्रयत्नांची पराकाष्टा तसेच इंग्रजीतून धडे त्याच जोडीने डिजिटल शाळा बाबतीत पुढाकार यामुळे शाळेचा हळू हळू विकास होत आहे. असे गौरवोद्गार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल यांनी काढले. यातच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वतीने आलेला शुभेच्छा संदेश पालकांना व विद्यार्थ्यांना वाचून दाखवत सर्वांना शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन कुंझरकर यांनी केले. ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आदिवासी वस्तीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छतेसाठी तसेच शैक्षणिक चैतन्य साठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल जिप अध्यक्षा नामदार सौ उज्वला मच्छिंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटभोळे , आदींनी अभिनंदन केले.