<
जळगांव(धर्मेश पालवे):-जिल्ह्यातील सुमारे एकोणाविस खात्यातील विविध मागास वर्गीय ओ बी सी ,अल्पसंख्याक समाजाच्या कामगार संघटनांचे कृती समितीच्या माध्यमातून स्थापित करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा आरक्षण बचाव कृती समिती च्या माध्यमातून स्वतंत्र मजदूर युनियन असणाऱ्या आणि र.न.एन. जी. पी.४७४५ शी संलग्न असणाऱ्या संघटनेच्या वतीने मूक धरणा आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आले .
जवळ जवळ ६००ते ६५० आरक्षणाचे लाभ घेऊन नोकरीत असणारे व लागणारे कर्मचारी, अधिकारी,व अभियंता वर्गाने सहभाग घेतला यात होता.वरील सर्व मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू असणारे ३३%आरक्षण सरकारने पूर्ण पणे बंद केले आहे. दरम्यान मागासलेपणा,पर्याप्त प्रतिनिधित्व व प्रशासनाची कार्यक्षमता याबाबत संख्यात्मक अहवाल तयार करून त्यानुसार राज्यातील विशेष, ओबीसी, अल्पसंख्याक,व मागास प्रवर्गातील कर्मचारी व अधिकारी यांना पदोन्नती देने शक्य असताना ही महाराष्ट्र सरकारने याकडे कानाडोळा केला आहे.त्याचबरोबर केंद्र शासनाच्या कर्मिक व प्रशिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही आदेशाच्या अनुसरून पदोन्नतीचे आरक्षण लागू करण्याचा सर्व राज्याना सूचित करूनही सरकारने अबलबजावणी केली नाही, उलट सर्वोच न्यायालयात अर्ज करून पदोन्नतीतील धोरणावर गदा आणली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सह जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी व अभियंता यांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिणामी, सदर मागण्या पूर्ण व्हाव्या, म्हणून हे लाक्षणिक उपोषण सह मूक धरणा आंदोलन केले असून,सदर उपोषणास असंख्य कर्मचारी व अधिकारी हजर होते .त्याच बरोबर अश्या आशयाचे निवेदन ही जिल्हा अधिकारी यांच्या द्वारे महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांना दिले असल्याचं जळगांव जिल्हा आरक्षण बचाव कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष एस के लोखंडे, जनरल सेक्रेटरी योगेश नन्नवरे,कोषाध्यक्ष हरीचंद्र सोनवणे यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.