<
जळगांव(प्रतिनीधी)- डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाऊंडेशन आणि द्वारा स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१ साठी वरील प्रमाणे विविध गट अनेकांचे मागणी वरून निर्माण करून जागतिक , आशिया, इंडिया रेकॉर्ड साठी संधी उपलब्ध करून दिली आहे. १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलून द्वारे अवकाशात नेण्याच्या या प्रकल्पात आता शालेय विदयार्थ्यांना सामील होता येईल.
शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजी ची जिज्ञासा आता निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये हे विद्यार्थी नक्कीच आपले योगदान देतील. खास महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठी मधून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज केलेले आहेत. या मुळे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय. त्याचे विविध भाग कुठले? त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवितात? या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात? कुठले सॉफ्टवेअर वापरायचे? अशी सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच दिली जाईल. जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम )१०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००० ते ३८००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलून द्वारे प्रस्थापित केले जातील. उपग्रह एका केस मध्ये फिट केलेले असतील . या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडायॉक्सिडं हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या पेलोड सोबत काही झाडांच्या बीज सुद्धा पाठवण्यात येत आहे. या मुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. आणि या मुळे हे विद्यार्थ्यांची खालील विक्रमांमध्ये नोंद केली जाईल.१) जागतिक विक्रम२) आशिया विक्रम३) इंडिया विक्रमप्रत्येक विद्यार्थ्यास वरील प्रमाणपत्र स्वतंत्र नावाने मिळतील. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण होऊन भविष्यात त्यांना करियर बनविताना नक्की उपयुक्त ठरेल. हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे रामेश्वरम येथून राबविला जात असून महाराष्ट्रामध्ये मनिषा चौधरी महाराष्ट्र राज्य समन्वयक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन यांचे नेतृत्वात यशस्वी होत आहे.