<
जळगाव(प्रतिनीधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३० व्या नाम विस्तार दिना निमित्त प्रा.संजय मोरे (अण्णा )राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीला प्रा.संजय मोरे, दिलीप शिरतुरे यांनी पुष्पहार अर्पण केला.
नामविस्तारासाठी शहीद झालेल्या शुर विराना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा.संजय मोरे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,१४ जानेवारी १९९१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे नाम विस्तार करण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी ही मागणी केली होती. या नाम विस्तारासाठी भारतामध्ये शेकडो दलीत बांधव शहीद झाले. संपुर्ण भारत देशामध्ये यासाठी वर्षोनुवर्षे आंदोलन करण्यात आले, अखेर या लढ्याला यश आले आणि डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या मराठवाडा औरंगाबाद येथील विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे नाम विस्तार करण्यात आला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवार हे १९९१ ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी भारतातील लाखो, आंबेडकरवादी अनुयायी यांचा अस्मितेचा प्रश्न सोडून औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार केला. त्याबद्दल शरदराव पवार यांचे अभिनंदन कार्यक्रम प्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमाला दिलीप शिरतुरे, मायाताई मोरे, ललिता शिरतुरे, संदीप शिरतुरे, अंजली तायडे, मीना शिरतुरे, शौर्य तायडे, प्रदीप शिरतुरे, प्रज्ञारत्न मोरे, वैष्णवी मोरे, चंदन मोरे, अर्चना अडकमोल, हर्ष अडकमोल, सचिन सुरवाडे, शिकदर तडवी, चंदन मोरे, विशाल मोरे उपस्थित होते.