<
जळगाव(प्रतिनीधी)- शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक निखिल जयंतीभाई ठक्कर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, शिव व्यापारी सेनेचे महानगर प्रमुख पूनम राजपूत, प्रशांत सुरळकर, अँड राजेश पावसे, कुणाल मोरे आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच उद्योजक, युवा उद्योजक यांच्या समस्या सोडविण्यासाठी तप्तर असेल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.