<
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वात महाविद्यालयाच्या “म्युझीक क्लबचा” मोठा हातभार
जळगाव, ता. १७ : प्रतिभेला मार्गदर्शन आणि संधीची साथ लाभली व प्रामाणिकपणे मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते या वाक्याला तंतोतंत साजेसे असे काम रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विध्यार्थी प्रवीण लाड याने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वढनेर भोलजी ता. नांदुरा या छोटयाशा गावात जन्मलेला युवाकलावंत प्रवीणचे नुकतेच “तुझे पैंजण” या शीर्षकाखाली तेरावे अल्बम प्रसिद्ध झाले आहे.
हा गीत अल्बम मोठ्याप्रमाणात लोकप्रिय होत असून दूरचित्रवाणीवरील ९ एक्स झक्कास, संगीत मराठी, मायबोली अशा विविध वाहिनीवर “तुझे पैंजण” या गाण्याचाच बोलबाला सुरु आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रवीणला लहानपणापासूनच कलेची आवड होती. रायसोनी महाविद्यालय विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळण्यासाठी म्युझिक क्लब, ड्रामा क्लब, डान्स क्लब अशा विविध क्लबच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असते आणि याच क्लबचा विध्यार्थी असणाऱ्या प्रवीण लाडने कला क्षेत्रात आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. गेल्या ३ वर्षापासून प्रविण लाड हा मनोरंजन क्षेत्रात मेहनत करताना त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांमधून , नाटकांमधून आणि लघुपटातून पाहायला मिळत आहे . ” अरविंद इंटरटेनमेंट ” प्रस्तुत ‘तुझे पैंजण ‘ ज्यांचे असोसिएट पार्टनर बंधन प्रॉडक्शन्स, मायरा प्रॉडक्शन्स आणि भाग्यदीप मुसिक असून हे गाणे गेल्या ८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण बंधन प्रोडक्शन यांनी केलेले आहे. ड्रोन पायलट घनश्याम यांनी ही छान चित्रीकरण केले. सोबतच केसावर फुगे फेम अण्णा सुरवाडे यांचे गीत व गायन असून पहिल्यांदाच ते रोमॅण्टिक गाण्यांमधून आपली छाप संपूर्ण महाराष्ट्र मध्ये टाकत आहेत, दिग्दर्शकाने आणि कथा लेखकाने गाण्यांमधून एक समाज प्रबोधन करत एका विधवा महिलेचे आयुष्य समाज कश्याप्रकारे बदलऊ शकतो सोबतच त्यांच्याकडे पाहण्याची नजर ही काळानुसार बदलायला हवी असे दाखावण्याचा खूप छान प्रयत्न या गाण्यातून केला आहे. सदर गाण्याचे चित्रीकरण हे खान्देश मधील रायपुर, पाल आणि पद्मालय येथे झालं असून तीन दिवसाच्या या चित्रीकरणात त्यांनी अप्रतिम दृश्य आणि छान गोष्ट या गाण्यातून दाखावण्याच्या प्रयत्न केला आहे.