<
जळगाव – येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे , केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तिन नवीन काळे कृषी कायदे करून शेतकऱ्यांवर लादले असुन, या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे संयुक्त किसान मोर्चा तर्फे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात देश बचाव … किसान बचाव , जय जवान … जय किसान , केंद्र सरकारचा धिक्कार असो … , नरेंद्र मोदी किसान विरोधी , अशा जोरदार घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला .
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केले . आंदोलनात छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , नियाज अली फाऊंडेशनचे अध्यक्ष अयाज अली , मणियार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख , चंदन बिऱ्हाडे , रमेश सोनवणे , प्रा. प्रीतीलाल पवार , हरिश्चंद्र सोनवणे सर , दिलीपभाऊ सपकाळे ,नाना मगरे , गौतम सपकाळे ,संदीप सोनवणे , भारत सोनवणे , यशवंत घोडेस्वार , महेंद्र कोळी , श्रीकांत मोरे , साहेबराव वानखेडे , राजू सपकाळे , ईश्वर मोरे , शिवराम पाटील , विवेक जावळे , विशाल सपकाळे , रिहान सय्यद , अकिल शेख , राहुल वराडे , जगदीश सपकाळे , राही खैरनार , फईम पटेल , गुरुनाथ सैंदाणे , लखन भालेराव , कौतीक तायडे , प्रभाकर सुरवाडे , युवराज सुरवाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .
उद्या दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी अली फाऊंडेशन तर्फे शेतकरी आंदोलन करण्यात येईल .