<
जळगाव(प्रतिनीधी)- ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित्त शहरात जिजाऊ ड्राइव्हिंग स्कुल, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, शहर वाहतुक शाखा जळगाव असे संयुक्तिक रित्या रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात वाहतूक नियमाबाबतचे मार्गदर्शन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख श्याम लोही तसेच महामार्ग पोलीस केंद्र पाळधी चे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सुनील मेढे व शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि. देविदास कुनगर यांनी मार्गदर्शन पर प्रबोधन करुन वाहतूक नियमांची माहिती दिली. सदर कार्यक्रमात महामार्ग पोलिस केंद्र पाळधीचे १२ पोलीस अंमलदार, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुचिता पाटील, जिजाऊ मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे दिनेश पाटील, नगरसेवक नितीन बरडे, रामानंद नगर पो.स्टेचे पो.नि.अनिल बडगुजर उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग रीक्षा, मॅटाडोर या चालकांना रस्ता सुरक्षा अभियान या बाबतीत सविस्तर माहिती दिली. तसेच सीटबेल्ट, हेल्मेट, नशापान या बाबतीत सविस्तर माहिती देऊन त्याचे फायदे व तोटे समजावून सांगितले. महामार्गावर वर होणार्या अपघाता बाबतीत माहिती दिली तसेच अपघात टाळण्यासाठी काय करता येईल याची माहिती देखील सविस्तर माहिती दिली.