<
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा ता. पाचोरा येथे काही दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षक म्हणुन श्री किसन नजन पाटील यांनी पदभार स्विकारलेला आहे. पोलीस अधिकारी व वकिल संघ यांचा यापुर्वी पोलीस स्टेशन पाचोरा यांचेशी कधीही संघर्ष झालेला नाही पोलीस व वकिल वर्ग यांना न्यायदानामध्ये महत्वाची भुमिका बजवावी लागते. तशी भुमिका व सहकार्य वकिल संघाने दिलेले आहे.अशी परिस्थिती असतांना काही वेळेस वकिलांना पक्षकाराचे हितासाठी व न्याय्य बाबीसाठी पोलीस स्टेशन येथे जावे लागते. त्या अनुषंगाने आमचे वकिल संघाचे सदस्य अॅड अनिल पी. पाटील व त्यांचे ज्युनियर सहकारी अँड.रोहीत ब्राम्हणे हे दि. २७ रोजी सकाळी ११-३० वाजचे सुमारास पो. स्टेशन पाचोरा येथे वयोवृध्द पक्षकारांनी केलेल्या विनंतीवरून गेले असता तेथे पक्षकाराची बाजु मांडली असता,पी.आय किसन पाटील व उपनिरीक्षक विकास पाटील यांनी एकेरी भाषेत “अरे तुला काही समजते का, तू माझे डोके नको खाऊ तू तुझी वकिली कोर्टात दाखव” अशा शब्दात अपमानास्पद वागणूक देवुन संपुर्ण वकिल वर्गाची मानहानी होईल असे शब्द वापरले.
तसेच पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी तू तूझी वकिली तीकडे दाखव असे बोलुन त्यांनी देखिल संपुर्ण वकिल वर्गाची मानहानी होईल असे गैरवर्तन वकिल संघाच्या सदस्यांसोबत केले आहे.. वरील पोलीस अधिकारी यांच्या गैरवर्तनाबाबत अॅड. अनिल पी.पाटील यांनी पाचोरा वकिल संघाकडे दि. ३० रोजी रोजी तकारी अर्ज दिला त्या अनुषंगाने पाचोरा वकिल संघाने दि. ११ रोजी मिटींग घेवुन संबधीत अधिक-यांच्या गैरवर्तनाबाबत निषेधाचा ठराव मंजुर केलेला आहे. तसेच पोलीस स्टेशन पाचोरा यांनी अध्यक्ष पाचोरा वकिल संघ यांचे नावे वकिल संघाच्या सदस्यांची काहीएक चुक नसतांना त्यांचे विरूध्द खोटा व लबाडी चा अर्ज दिलेला.पोलीस निरीक्षक नजन पाटील, उपनिरीक्षक विकास पाटील यांनी वकिली व्यवसायाला उद्देशून अपमानास्पद शब्द तसेच गलिच्छ भाषा वापरून मानहानी व अपमान होईल अशी वागणूक दिली आहे. सदर गैरवर्तणूक बद्दल सबधितांवर आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून समज देण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन जिल्हा वकील संघ, पाचोरा तालुका वकील संघ यांच्या तर्फे जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी,जळगाव जिल्हा वकील संघ अध्यक्ष अॅड.दिलीप बोरसे,सचिव अॅड.दर्शन देशमुख,उपाध्यक्ष अॅड प्रभाकर पाटील,सदस्य, अॅड.नवलसिंग नाईकडा,सदस्य अॅड.गणेश सावळे, अॅड. प्रकाश पाटील, अॅड.सुनील पाटील, अॅड. संजयसिंग पाटील, अॅड. बाळु साळी, सर्व सन्माननीय वकील संघाचे पदाधिकारी आदी हजर होते.