Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छावा मराठा युवा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
छावा मराठा युवा महासंघातर्फे शिवजयंती निमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . यावेळी आर्यन प्ले स्कुलच्या विद्यार्थ्यांनी कराट्यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक , शिवकालीन वेशभूषा , शिवाजी महाराजांबद्दलचे उत्तम वक्तृत्व आणि कथ्थक व इतर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले . महापौर भारतीताई सोनवणे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण होऊन प्रमुख अतिथींनी दीपप्रज्वलन व अभिवादन करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले त्यात ते म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे राष्ट्र निर्माण करायचे असेल , तर बालपणापासुनच मुलांवर शिव संस्कार व्हायला हवे . तसेच त्यांना क्रीडा व व्यायामाची गोडी लागावी व ते बलशाली व्हावेत म्हणूनच अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे .
यावेळी प्रमुख अतिथी उपमहापौर सुनीलभाऊ खडके , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे , राजेश ( गोगा शेठ ) मुंदडा , राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील , सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ धांडे , सौ. सरीताताई कोल्हे , डॉ. सुषमा चौधरी , नगरसेविका मिनाक्षी पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जिवनातील वेळवेगळ्या प्रसंगाचे संदर्भ देत मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले . आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यन प्ले स्कुलचे अजय काशीद , मोनिका चौधरी , राजेश इंगळे , संकेत वारुळकर , अमन तडवी , जितेंद्र पाटील , सुजाता मॅडम आणि छावा मराठा युवा महासंघाचे किरण ठाकूर , आकाश धनगर , कृष्णा जमदाडे , सागर मोतीराडे यांनी परिश्रम घेतले .
पारितोषिक वितरण अमोल कोल्हे , मुकुंदभाऊ सपकाळे , गोगा सेठ मुंदडा , डॉ. दिपक चौधरी , हरिश्चंद्र सोनवणे सर , डॉ. सुषमा चौधरी , कृष्णा माळी व छावाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामीण भागात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक गट स्थापन करावे- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

कोरोनोशी पुन्हा दोन हात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे;कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

Next Post
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांत निर्बंध आदेश जारी

कोरोनोशी पुन्हा दोन हात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे;कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo