Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवजीवन सुपर शॉप मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा -विविध सामाजिक संघटनांचे निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
नवजीवन सुपर शॉप मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा -विविध सामाजिक संघटनांचे निवेदन

जळगांव(प्रतिनीधी)- येथील नवजीवन सुपर शॉप मध्ये शहरातील एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ काढून त्याला व्हायरल केल्या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य पोलिस कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन छावा मराठा युवा महासंघ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात देण्यात आले.

याबाबत सविस्तर असे की, शहरातील महाबळ परिसरातील नवजीवन सुपर शॉपमध्ये एक वृद्ध महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने आली असता सदरील महिलेने तेथील काही सामान चोरुन नेण्याचा प्रयत्न केला, परंतू सदरील घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने सदर महिलेला ऑफीसमध्ये चौकशीसाठी बोलविले असता, तिच्या जवळ चोरी केलेले सामान आढळून आले. प्रसंगी तिची चौकशी सुरू असताना तेथील काही कर्मचाऱ्यांनी सदरील घटनेचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद करुन त्या व्हिडिओत सदरील महिलेचे तोंडावरील मास्क काढत, एखाद्या महिलेला लाजवेल असा घृणास्पद व्हिडिओ काढून शहरातील विविध सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी नवजीवन सुपर शॉप मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर भादंवी कलम ४९९, ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अश्या आशयाचे निवेदन छावा मराठा युवा महासंघाने व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिले. प्रसंगी, साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सारिताताई माळी- कोल्हे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , सामाजिक कार्यकर्ते दिपक सपकाळे, सौ. रेखा पाटील अॅड.अभिजित रंधे, प्रशांत फाळके उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी उद्या परीक्षा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींना दिल्या शुभेच्छा!

Next Post

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

Next Post
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo