<
जळगाव, दि.5 (प्रतिनिधी) –
महाराष्ट्रासह देशभरात कोव्हिडं सशुल्क लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. यात शासनाने शहरात लसीकरणासाठी विविध सेंटर जाहीर केले आहे यात जळगाव येथील कांताई नेत्रालय यांनाही अधिकृत कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर चा दर्जा दिला असून आजपासून या केंद्रात लसीकरणाची सुरुवात करण्यात आली , आज पहिल्याच दिवशी लसीकरणास उत्तम प्रतिसाद मिळाला, लसीकरण केंद्राचे औपचारिक उद्घाटन सेवादास दलीचंद जैन व जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी लस घेऊन केले , हे सेंटर सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी लस टोचुन घेतली आहे , कांताई नेत्रालयात या लसीकरणासाठी 3 बूथ तयार करण्यात आले असून, कांताई नेत्रालयाच्या आवारात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आणि स्वतंत्र लसीकरण विभाग तयार करण्यात आला आहे, नोंद केलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे, उत्तम प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे,
जळगाव येथील जुन्या राष्ट्रीय महामार्ग अर्थात जुन्या पाईप फेक्टरीत पाच वर्षांपूर्वी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रध्देय भवरलालजी जैन यांच्या कल्पनेतून अद्ययावत नेत्रालय सुरू झाले.या नेत्रालयात आवारात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार व दरानुसार या लसीकरण केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली
आहे.