<
जामनेर/प्रतिनिधी-अभिमान झाल्टे दि.०८/०३/२०२१(सोमवार) रोजी पाळधी ता.जामनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने शिवसन्मान प्रतिष्ठान,जामनेर तालुका यांच्यातर्फे राजगड हॉस्पिटलच्या आवारात गृहिणी महोत्सव २०२१ साजरी करण्यात आला. यामध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर,रांगोळी स्पर्धा,मेहंदी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा,उखाणे स्पर्धा ह्यांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याई-जिजाई-रमाई-सावित्रीबाई यांचे प्रतिमा पुजन करुन करण्यात आले.
प्रसंगी शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष विश्वजितराजे मनोहर पाटील यांनी शिवसन्मान प्रतिष्ठान महिला अध्यक्ष पदासाठी डॉ.प्रियंका पाटील यांचे नाव जाहीर केले. यावेळी बोलतांना त्यानी सांगितले की,येणाऱ्या काळात स्रीयांनी स्वकर्तृत्वावर समाजकारणात-राजकारणात पुढे आले पाहीजे आणि तुम्हाला केव्हाही गरज भसली तर तुमचा हा भाऊ नहमी तुमच्यासाठी उभा असेन असा शब्द या प्रसंगी दिला.
यावेळी डॉ.उज्वला पाटील अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्या प्रमिला राघो पाटील, मा.पं.स.सभापती नीता कमलाकर पाटील,बचत गट अधिकारी दिपक गोपाळ सर, दिवाकर नारायण पाटील(नांद्रा प्र.लो.) हे उपस्थित होते. स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून सुरेखा अतुल सोनवणे,वैशाली सुरेश पाटील, कविता किरण पाटील, निशा भावराम पाटील ह्यानी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सावकारे ह्यानी केले तर मनोगत विश्वजितराजे पाटील, दिपक गोपाळ,प्रमिला पाटील आणि तेजस्वीनी शिंपी यांनी व्यक्त केले व आभार डॉ.वैभव पाटील यांनी मानले.
कार्यक्रमात महिला बचत गटाच्या महिलांनी देखील हजेरी लावली होती.काही महिलांनी गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. असा कार्यक्रम पाळधी परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आला होता आणि महिलांनी आनंदाने जागतिक महिला दिन साजरा केला.
यावेळी शिवसन्मान प्रतिष्ठानचे पाळधी शहर उपाध्यक्ष निलूआबा पाटील,शहर सचिव अजय बडगुजर हर्षल पाटील,अनिकेत पाटील,पवन पाटील, अक्षय पाटील,मुकेश जाधव,दिनेश पाटील,अक्षय पाटील यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.