<
आनंद गांगुर्डे हे पत्रकार म्हणून कर्तव्य बजावत असताना पो.हे.कॉ धर्मराज पाटील यांनी केलेल्या अमानुष मारहाण आणि बाबत यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले
लाँकडाऊनच्या काळात म्हणजेच 13. 3. 2021 रोजी सकाळी साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सिंगल पॉईंट जवळ पोलीस करत असलेल्या चांगल्या कामगिरीची दखल घेण्याच्या हेतूने आनंद गांगुर्डे हे इंडिया स्टिंग न्यूज या चैनल चा पत्रकार म्हणून मोबाईल द्वारे शूटिंग करत असताना धर्मराज पाटील हे यांच्या जवळ आले आणि त्यांच्या हातातल्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली व शिवीगाळ करत म्हणाले तु कोण आहेस गांगुर्डे यांनी पत्रकार सांगताच म्हणाले की तुझे पत्रकार माझे काहीही ऊखाडु शकत नाही कोणाच्या परवानगीने शूटिंग घेत आहे आनंद गांगुर्डे यांनी त्यांना सांगितले की सार्वजनिक ठिकाणी एखाद्या चांगल्या किंवा वाईट कामाची शूटिंग देण्यास कोणाची परवानगीची आवश्यकता नाही असं बोलतात धर्मराज पाटील यांनी त्यांच्या हातातल्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि गांगुर्डे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला हा प्रकार सुरू असताना .
पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड घटनास्थळी आले व त्यांनी त्याची धर्मराज पाटील यांच्या कचाट्यातून सुटका केली गांगुर्डे हे वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे कर्तव्य बजावत असताना धर्मराज पाटील यांनी त्यांचे निष्कारण केलेल्या बेदम मारहाण केलेल्या व दिलेल्या दमबाजी आणि शिवीगाळ बाबत धर्मराज पाटील यांच्याविरुद्ध आनंद गांगुर्डे यांची लेखी तक्रार दिली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने धर्मराज पाटील यांच्याविरुद्ध कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही तरी धर्मराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने चाळीसगाव तहसील कचेरीसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.
अशी मागणी जेष्ठ पत्रकार किसनराव जी जोर्वेकर जिल्हा अध्यक्ष प्रविणजी सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले .
यावेळी आनंद गांगुर्डे, गफ्फार मलिक, रोहित शिंदे, रणधीर जाधव, योगेश मोरे, खुशाल बिडे, गफार शेख, राजू चव्हाण, सोजीलाल हाडपे, जीवन चव्हाण, दीपक गढरी,आदी उपस्थित होते.