<
सत्यमेंव जयते न्युज चा ईफेक्ट – तत्काळ पंचनामे सुरू
भडगाव – (प्रतिनिधी) – दि.२३ मार्च रोजी पाचोरा व भडगाव तालुक्यात वादळी बेमोसमी पावसाने थैमान घातले, त्यात अंतिम टप्यात आलेला रब्बी हंगाम अक्षरशः आडवा पडला. ज्वारी, मका, गहू, बाजरी, लिंबू इ. पिकांचे व फळबागांची झाडे उन्मळून पडले आहेत, त्यामुळे सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवस अन्नपान्याला श्रवण केले नाही.
शेतकर्यांचे कैवारी किशोर आप्पा पाटील यांनी आढावा घेत तात्काळ प्रांताधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.
तालुका कृषिअधिकार्यांना त्यांनी प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या, पंचनामा पासून एकही शेतकरी वंचित राहू नये असे सांगितले, त्या दरम्यान पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तात्काळ तांदुळवाडी, भोरटेक, उंबरखेड, कजगाव सह नुकसानीची पाहणी करतांना आमदार किशोर आप्पा पाटील, तहसिलदार सागर ढवळे, मंडळ कृषीअधिकारी सचिन वानखेडेकर, सुधाकर पाटील, प्रल्हाद पवार तालुका प्रतिनिधी, पंचायत समिती सभापती सौ.डॉ.अर्चना पाटील, व डॉ. विशाल पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), कृषी सहाय्यक सचिन पाटील यांनी तांदुळवाडी शिवारातील श्री.कैलास केशव पवार यांच्या शेतात जाऊन पंचनामा केला, तरी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व परिसरातील संपूर्ण शेतकरी पाहणी करताना उपस्थित होते.
तांदुळवाडी शिवारातील शेतकऱ्यांशी पाहणी करून किशोर आप्पा पाटील यांनी सव्वाद साधून वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी राजाने आपली काळजी घ्यावी असे सव्वाद साधतांना किशोर आप्पा पाटील हे म्हटले.