<
हळुवार पावलांनी
तुझे असेच येणे
रेंगाळले मन हे यज्ञ
दाटून आले क्षण ते
हळुवार पावलांनी तुझे…..
मन झुरले रानोमाळी
मौन किती दिवसाचे
कोमेजलेली कळी मी
उमलू कधी सांगणारे
हळुवार पावलांनी तुझे….
आभास मिठीतला
अबोल प्रीत ही सारी
चकवून गेला सारा
सारा शांत वारा
हळुवार पावलांनी तुझे….
आठवणींचा गारवा
झोंबला या जीवाला
पाउल न पडता
ओसाड झालेल्या पाऊलवाटा
हळुवार पावलांनी तुझे…..
ओसाड प्रीती तुझी रे
सांजवेळी बहरू दे
मन किलबिल होऊन
तुझ्यात सारं बरसू दे
हळुवार पावलांनी तुझे….
कळी हळू उमलता
नवा डाव मांडू पुन्हा पुन्हा
हसता गाली क्षणिक
क्षणभराची होईल तुझी रे…