<
जळगांव(धर्मेश पालवे)-शहरात रस्त्यावरील व रहदरीच्या ठिकाणी असणाऱ्या मोकाट व सोडून दिलेल्या जनावरांच्या कळपा मुळे लोकांचे अनेक अपघात व किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त प्रसिद्धीस आले आहे.अश्याच प्रकारे जळगांव जिल्ह्यातील रामानंद परिसरातील बस स्थानक ते एच डी एफ सि ATM पर्यंत च्या रस्त्यात नेहमी मोकाट जनावरे फिरत असतात, ही जनावरे मंदिर परिसर,रस्त्यावरील फेकलेले अन्न, कचरा पेटी जवळील अन्न व कचरा ,असे खान्यासाठी जमा होतात.आज १८ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक ८वाजून३०मिनिटांनी एका भरधाव असणाऱ्या गाडीने एक गायीचे वासरू ला धडक देत निघून गेली,वासरू मृतप्राय अवस्थेत पाहून इतर जनावरे कळपा कळपात विखुरले आणि पूर्ण रस्त्यावर या जनावरांच्या गर्दीत वाहन खोळंबली होती.मृत वासराला तेथिलच रहिवाश्यांनी पुरविण्यास नेले,तर गुरांची गर्दी कमी केली.झाल्या प्रकाराने सर्वांचे मन हळहळले मात्र नगरपालिका मोकाट कुत्रे, व जनावरे यांच्या नियंत्रणात अपयशी ठरले आहे, ठोस उपाय योजनाचा अभाव पुन्हा दिसून आल्याचं ,व शहरी मोकाट जनावरांना रस्त्यावर फिरण्यास व त्याच्या मृत्यूस नगरपालिका जबाबदार आहे असा सूर काढत ,यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असेही आपसात प्रत्यक्ष बघणारे लोकं चर्चा करत होते.