<
नंदुरबार – शाश्वत स्वच्छता अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील पहिली शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्त ग्रामपंचायत कोकणीपाडा हि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सारिका बारी व गटविकास अधिकारी नदंकुमार वाळेकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
सदर ग्रामपंचायत सुरुवाती मध्ये एन.एस.ई. फौंडेशनच्या मदतीने CYDA (centre for youth development activities) संस्थेच्या मार्फत शाश्वत स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला त्या नंतर गावातील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ, युवक मंडळ यांच्या मार्फत गावात उघड्यावरील हागणदारी मुक्ती साठी विविध उपक्रमा द्वारे लोक प्रबोधन करण्यात आले आणि त्या नंतर ५ महिन्याच्या अथक परिश्रमाने सदर ग्रामपंचायत ही शाश्वत हागणदारी मुक्त करण्यात आली त्यासाठी आज रोजी शाश्वत उघड्यावरील हागणदारीमुक्त ग्राम महोत्सव घेऊन सदर ग्राम पंचायत शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ.सारिका बारी(उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग), श्री.नंदकुमार वाळेकर (गटविकास अधिकारी नवापूर,नंदुरबार), योगेश कोळपकर(स्व.भा.मि),श्री.किरण गावित (विस्तार अधिकारी), कुवर नाना (विस्तार अधिकारी), श्री आर के गावित(सहायक विस्तार अधिकारी स्व.भा.मि), श्री.दुर्जनसिंग कोकणी (सरपंच कोणीपाडा), श्री सुभाष पवार (ग्रामविकासअधिकारी कोकीनिपाडा),सुनील सहारे (जिल्हा व्यवस्थापक CYDA),मंगेश निकम (क्षमता बांधणी समन्वयक),योगेश नेरपगार ( स्वच्छता समन्वयक)
आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.