<
बोदवड(संजय वराडे):-हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र सांगते, असे म्हणतात. छायाचित्र म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू व घटनेची टिपलेली प्रतिमा. १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. आज जागतिक छायाचित्रण दिन…दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले… तथापि, या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे .या दिनाच्या निमित्ताने सर्व छायाचित्रकारास हार्दिक शुभेच्छा .