<
जळगांव(धर्मेश पालवे):-येथील तांबापुरा भागात राहणाऱ्या दोघ मित्रांच्या झटपट श्रीमंत होण्याची लालसेचे बिंग उघड झाले आहे, त्यांनी झेरॉक्स मशीन खरेदी करून महिना भरापासून घरातच नकली नोटा बनवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. या नोटा चलनात आणल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळताच शनिवारी रात्री दोघांच्या मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून ७४हजार ३००रुपये किमतीच्या १०० रुपयाच्या७०० नोटान सह झेरॉक्स मशीन जप्त करण्यात आले आहे.अहमदखान अफजलखान व शेख रईस शेख रशीद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अफजलखान , रईस हे दोघं तांबापुरात राहात होते या दोघांमध्ये मैत्री आहे, दरम्यान दोघांनी महिन्याभरापूर्वी युट्युब वर नकली नोटा तयार करण्याचा व्हिडिओ पाहीला व यात एक झेरॉक्स मशीनच्या मदतीने हव्या त्या दराच्या नकली नोटा तयार करण्यात येत असे दाखविले होते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांनी तयारी सुरू केली ,श्रीमंत होण्याची अफलातून पद्धत वापरण्यासाठी त्यांनी महागडे किंमतीचे झेरॉक्स मशीन खरेदी करून १०० रुपयांच्या नकली नोटा तयार करीत गोरख धंदा सुरूही केला होता.यातील अनेक नोटा सध्या चलनात फिरत आहेत ,हे करत असताना त्यांचा मोह वाढल्याने गेल्या काही दिवसापासून ते मोठ्या प्रमाणात नोटा तयार करीत होते परंतु, या नोटा चलनात आणण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या म्हणून यासाठी त्यांनी त्याचेच पहूर येथील एका नातेवाईकाना याबाबतची माहिती देऊन या खेड्यात या नोटा चलनात आणून देण्याची विनंती केली. त्यानुसार त्याच्या नातेवाईक ने काही नोटा चालवण्यात प्रयत्न केला यावेळीही माहिती लिंक झाली पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचतात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम पोलीस उपनिरीक्षक गुप्ते अशोक महाजन, सुनील दामोदरे, रवींद्र पाटील ,अनिल देशमुख, अनिल जाधव, मधुकर आंभोरे,अशरफ शेख व दीपक पाटील यांच्या पथकाने पहूर पासून तपास सुरू केला अखेर हा तपास तांबापुरा येथील अमदत वर रईस त्यांच्या पर्यंत येऊन थांबला.शनिवारी रात्री दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांकडून नकली नोटा झेरॉक्स मशीन ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे,बनावट नोटा तयार करणारे रॅकेट नाही ना? या अनुषंगाने पोलिसांचे पथक कासून तपास करीत आहे .