<
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार खाजगी आस्थापना ची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमशंकर जमादार तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी प्रा.आरोग्य केंद्र नेरी तालुका जामनेर अंतर्गत सुप्रीम कम्पनी येथे रॅपिड़ अँटीजेन टेस्ट कॅम्प चे आयोजन करण्यात आले.
कॅम्प मध्ये एकुण 500 कामगारांची तपासणी करण्यात आली.
त्या पैकी 22 कामगार पॉझिटिव्ह आढळुन आले.काल 500 कामगारां पैकी 4 कामगार पॉझिटिव्ह आढळून आले होते.
कॅम्प साठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका भोळे, डॉ.सीमा तडवी, आरोग्य सहाय्यक एस. एस.बावीस्कर ,आरोग्य सेवक विजु पवार,राजु पवार, विक्रम राजपूत,संदीप सावकारे भाऊ,गणेश पाटील,आरोग्य सेविका सुजाता सोनवणे, प्रभु देसाई,दिलीप बच्छाव, किरण घुले, अविनाश कदम, अमोल सूद यांनी सहकार्य केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांच्याकडुन सुप्रिम कर्मचारी संख्येनुसार रॅपिड अँटीजन किट प्राप्त झाल्यामुळे तात्काळ कॅम्प चे नियोजन करणे शक्य झाले व पॉझिटिव्ह कामगारांना पळासखेडा येथील कोव्हिडं केयर सेंटर येथे विलगिकरणात पाठवून संसर्ग आटोक्यात आणणे शक्य झाले असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.